IPL 2024 kkr vs rcb : विराटविरुद्ध स्टार्क आजचे आकर्षण ; बंगळूर आणि कोलकतामधील लढत रंगतदार होण्याची अपेक्षा

विराट कोहली आधारस्तंभ असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि कोलकता नाईट रायडर्स या फॉर्मात आलेल्या दोन संघांत उद्या आयपीएलमधला सामना होता आहे. दोन्ही संघांची ताकद समान असल्यामुळे ही लढत अटीतटीची होईल, अशी अपेक्षा आहे.
IPL 2024 kkr vs rcb
IPL 2024 kkr vs rcbsakal

बंगळूर : विराट कोहली आधारस्तंभ असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि कोलकता नाईट रायडर्स या फॉर्मात आलेल्या दोन संघांत उद्या आयपीएलमधला सामना होता आहे. दोन्ही संघांची ताकद समान असल्यामुळे ही लढत अटीतटीची होईल, अशी अपेक्षा आहे. विराट कोहलीविरुद्ध मिचेल स्टार्क लढत आकर्षक असू शकेल. अगोदरच्या सामन्यात बंगळूरने पंजाब संघाचा चार विकेटने तर कोलकताना हैदराबाद संघावर चार धावांनी विजय मिळवलेला आहे.

विराट कोहलीने पंजाबविरुद्ध झंझावाती फलंदाजी केल्यामुळे बंगळूरचा संघ समाधान वाटत असले तरी दुसरीकडे कर्णधार फाफ डुप्लेसी, ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमेरून ग्रीन यांचे अपयश चिंतेत टाकणारे आहे. दिनेश कार्तिक आणि महिपाल लोमरोर यांच्या झंझावातामुळे त्यांना पंजाबविरुद्ध विजय मिळवता आला होता.

कोलकता संघाचीही परिस्थिती अधिक वेगळी नाही. रिंकू सिंग आणि आंद्र रसेल असे स्फोटक फलंदाज त्यांच्याकडे आहे; परंतु नितीश राणा, कर्णधार श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर यांचा फॉर्म प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. कोलकताची गोलंदाजी मात्र कागदावर तरी सक्षम आहे, त्यामुळे बंगळूरच्या फलंदाजांना उद्याच्या सामन्यात अधिक परिश्रम घ्यावे लागतील. तर बंगळूरकडे असलेले मोहम्मद सिराज आणि यश दयाल कोलकता फलंदाजांना किती अडचणीत टाकतील, हा प्रश्न आहे. वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफने पहिल्या दोन सामन्यात अनुक्रमे ०/३८ आणि १/४३ अशी कामगिरी केलेली असल्यामुळे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रीस टोपले याला संधी मिळू शकते.

IPL 2024 kkr vs rcb
IPL 2024 Hardik Pandya : मुंबई इंडियन्समध्ये माजली दुफळी... टीम रोहित अन् हार्दिक पांड्याचा वेगळा गट?

बीसीसीआयने वार्षिक करारातून वगळल्यामुळे निराश झालेला श्रेयस अय्यर आपली बॅट तळपण्यासाठी प्रयत्नशील आहे. रणजी अंतिम सामन्यात त्याने ९५ धावांची खेळी केली होती; परंतु आयपीएलच्या सलामीला तो शून्यावर बाद झाला होता. आपली गुणवत्ता पुन्हा सिद्ध करण्यासाठी श्रेयसला मोठ्या प्रमाणात धावा कराव्या लागणार आहेत.

आयपीएलच्या लिलावात दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक रक्कम मिळालेला मिचेल स्टार्क सलामीला पूर्णपणे अपयशी ठरला होता. चार षटकांत त्याने ५० धावा दिल्या होत्या. त्यामुळे त्याच्यासमोरही आपल्याला मिळालेली किंमत वाजवी आहे, हे सिद्ध करण्याचे आव्हान असेल. फॉर्मात आलेला विराट कोहली आणि मिचेल स्टार्क हे द्वंद्व लक्षवेधक ठरू शकेल. स्टार्क या अगोदरची आयपीएल बंगळूर संघातून खेळला होता. कोलकताकडे सुनील नारायण हे फिरकी गोलंदाजीतले हुकमी अस्त्र आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : फाफ डुप्लेसी (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, दीपकुमार, दीपकुमार विजय, दीपक विजय, मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरॉन ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम कुरन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्निल सिंग, सौरव चौहान.

कोलकाता नाइट रायडर्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), केएस भरत, रहमानउल्ला गुरबाज, रिंकू सिंग, आंग्रिश रघुवंशी, शेरफेन रदरफोर्ड, मनीष पांडे, आंद्रे रसेल, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, अनुकुल रॉय, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती. अरोरा, चेतन सकरिया, हर्षित राणा, सुयश शर्मा, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, साकिब हुसेन, मुजीब उर रहमान.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com