IPL 2024: चेन्नई-कोलकाताच्या विजयाने पाँइंट्स टेबलमध्ये उलटफेर, प्लेऑफची शर्यत झाली रंगतदार

IPL 2024 Points Table: रविवारी आयपीएलमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सने विजय मिळवले. त्यामुळे पाँइंट्स टेबलमध्ये मोठे बदल झाल्याचे पाहायला मिळाले.
 KKR | CSK | IPL 2024
KKR | CSK | IPL 2024Sakal

IPL 2024 Points Table: रविवारी आयपीएलमध्ये डबल हेडर असतो, त्यानुसार 5 मे रोजी देखील दोन महत्त्वाचे सामने झाले, महत्त्वाचे म्हणजे या दोन सामन्यांनंतर आता प्लेऑफसाठी चुरस आणखी रंगतदार झाली आहे.

रविवारी पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स धरमशाला येथील निसर्गरम्य स्टेडियममध्ये पंजाब किंग्सला 28 धावांनी पराभूत करत मागच्या पराभवाचा वचपा काढला. तर दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने लखनौ सुपर जायंट्सला त्यांच्याच घरच्या मैदानात एकाना स्टेडियमवर तब्बल 98 धावांनी पराभवाचा धक्का दिला.

या सामन्यांनंतर आता कोलकाताने गेल्या अनेक आठवड्यांपासून अव्वल क्रमांकावर विराजमान असलेल्या राजस्थान रॉयल्सला मागे टाकलं आणि अव्वल क्रमाक पटकावला. आता कोलकाता आणि राजस्थान या दोन्ही संघांचे 16 पाँइंट्स आहेत. तर चेन्नईनेही विजय मिळवत लखनौ आणि सनरायझर्स हैदराबादला नेट रन रेटच्या जोरावर मागे टाकत तिसरा क्रमांक मिळवला.

आता कोलकाता आणि चेन्नईच्या विजयाने पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुच्या प्लेऑफच्या आशा जवळपास संपवल्या आहेत. त्याचबरोबर राजस्थान आणि कोलकाताने प्लेऑफमधील स्थान जवळपास पक्के केले आहे. त्यामुळे आता प्लेऑफसाठी उर्वरित दोन जागांसाठी चेन्नई, हैदराबाद, लखनौ आणि दिल्ली संघ आगामी काळात लढताना दिसतील.

दरम्यान, सामन्यांबद्दल सांगायचं झालं, तर चेन्नईचा कर्णधार ऋतुराज 10 व्यांदा टॉस हारला, त्यामुळे पंजाबने टॉस जिंकत पहिली बॉलिंग घेतली.

त्यांच्या गोलंदाजांनी या निर्णयाला साजेशी गोलंदाजीही केली आणि चेन्नईला 20 ओव्हरमध्ये अवघ्या 167 धावांत रोखले. तरी चेन्नईकडून रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड अन् डॅरिल मिचेलने दिलेल्या लढाईमुळे चेन्नईला 160 धावा ओलांडता आला.

विशेष म्हणजे या सामन्यात हर्षल पटेलने तुफान फॉर्ममध्ये असलेल्या धोनीला गोल्डन डकवर माघारी धाडलं. मात्र, त्यानंतर चेन्नईच्या गोलंदाजांनी कमाल केली. प्रमुख वेगवान गोलंदाज जायबंदी असताना फिरकीपटूंनी जबाबदारी घेतली. त्यांनी पंजाब किंग्सला 20 ओव्हरमध्ये 9 बाद 139 धावांवरच थांबवलं.

जडेजानं गोलंदाजीतही प्रभाव पाडताना 3 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या, तर तुषार देशपांडे आणि सिमरजीतनेही प्रभावी मारा करताना 2-1 विकेट्स घेतल्या. मिचेल सँटेनर शार्दुल ठाकूरने किफायतशीर गोलंदाजी करताना 1-1 विकेट घेतली.

 KKR | CSK | IPL 2024
LSG vs KKR: फक्त गॉथम-रमणदीपनेच नाही, तर बाऊंड्री लाईनवर बॉल-बॉयनंही घेतला अफलातून कॅच; जॉन्टी ऱ्होड्सनेही केलं कौतुक

दुसऱ्या सामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलने टॉस जिंकून कोलकाताला बॅटिंगला बोलावलं.कोलकाताकडून सुरुवातीला फिलिप सॉल्ट आणि सुनील नारायणने आक्रमण केले. नारायणने आक्रमक अर्धशतकही केले. अखेरीस रमनदीप सिंगनेही तुफानी फटकेबाजी केली.

त्यामुळे या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 235 केल्या. त्यामुळे फक्त आयपीएलमध्येच नाही, तर टी20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एकाना स्टेडियमवर 200 धावांचा टप्पा पार झाला.

मात्र 236 धावांचं भलंमोठं आव्हान लखनौच्या फलंदाजांना पेलवलं नाही. त्यांनी नियमित अंतरानं विकेट्स गमावल्या. लखनौचा डाव 16.1 षटकात 137 धावांवरच संपला.

लखनौकडून फक्त मार्कस स्टॉयनिस आणि केएल राहुल यांनाच 20 धावांचा टप्पा ओलांडता आला. कोलकाताकडून हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्तीने 3-3 विकेट्स घेतल्या अन् आंद्रे रसेलने 2 विकेट्स घेतल्या, तर मिचेल स्टार्क आणि सुनील नारायण यांनाही 1-1 विकेट मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com