IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

IPL 2024 League Stage: रविवारी आयपीएल 2024 स्पर्धेची साखळी फेरी संपली अन् पाँइंट्स टेबलमधील संघांच्या क्रमवारीवर शिक्कामोर्तब झालं.
SRH | IPL 2024
SRH | IPL 2024Sakal

IPL 2024, SRH vs PBKS: आयपीएल 2024 स्पर्धेची साखळी फेरी अखेर रविवारी संपली. तब्बल 70 सामन्यांनंतर अंतिम 4 संघ निश्चित झाले अन् त्यांच्या क्रमवारीवरही शिक्कामोर्तब झाले.

अखेरच्या सामन्यापर्यंत दुसऱ्या क्रमांकासाठी चुरस पाहायला मिळाली, पण अखेर गुवाहाटीत होणारा राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स सामना पावसामुळे रद्द झाला अन् सनरायझर्स हैदराबादने पाँइंट्स टेबलमधील दुसऱ्या क्रमांकावर स्थान पक्कं करत पहिल्या क्वालिफायरचं तिकीट मिळवलं.

खरंतर साखळी फेरीचा शेवटचा दिवसापूर्वीच प्लेऑफमधील चार संघ पक्के झाले होते, तरी शेवटच्या दिवशी राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात दुसरा क्रमांक मिळवण्यासाठी स्पर्धा होती. त्यामुळे या दोन्ही संघांना आपापल्या शेवटच्या साखळी सामन्यात विजय आवश्यक होता.

कोलकाताने पहिला क्रमांक आधीच निश्चित केला होता, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं चौथा क्रमांक मिळवला होता. त्यामुळे दुसरा क्रमांक मिळवण्यासाठी हैदराबादला पंजाबविरुद्ध, तर राजस्थानला कोलकाताविरुद्ध विजय गरजेचा होता.

SRH | IPL 2024
IPL 2024 Playoffs: कोलकाता-राजस्थान सामना रद्द होताच प्लेऑफच्या शेड्युलवर शिक्कामोर्तब; कोणाचा सामना कोणाविरुद्ध, घ्या जाणून

शेवटी रविवारी हैदराबादने पंजाबला 4 विकेट्सने पराभूत करत आपलं काम चोख बजावलं आणि 17 पाँइंट्सपर्यंत ते पोहचले. त्यामुळे सर्वांचेच लक्ष शेवटचा साखळी सामना असलेल्या राजस्थान-कोलकाता सामन्याकडे होतं.

पण या सामन्यात पावसानं बाजी मारली. त्यामुळे दोन्ही संघांना 1-1 पाँइंट वाटून देण्यात आला अन् राजस्थानही 17 पाँइंट्स पर्यंत पोहचले. पण हैदराबादने त्यांना नेट रन रेटच्या जोरावर मात देत दुसरा क्रमांक पटकावला. त्यामुळे राजस्थान तिसऱ्या क्रमांकावर राहिले. आता त्यांना आधी एलिमिनेटर सामना खेळावा लागणार आहे.

दरम्यान, रविवारी दुपारी हैदराबादने मिळवलेल्या विजयाबद्दल सांगायचं झालं तर पंजाबने त्यांच्यासमोर 215 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं होतं. त्यातच हैदराबादनं पहिल्याच चेंडूवर तुफान फॉर्ममध्ये असलेल्या ट्रेविस हेडची विकेट गमावली.

पण तरी फॉममध्ये असलेल्या अभिषेक शर्मानं अर्धशतक करत जबाबदारी उचलली आणि हैदराबादला विजयासाठी भक्कम पाया रचून दिला. त्याला राहुल त्रिपाठी अन् नितीश रेड्डीनं तोलामोलाची साथ दिली.

त्यानंतर हेन्रिक क्लासेनच्या खेळीने हैदराबादचा विजय आणखी सोपा केला. तो विजयासाठी अवघ्या 7 धावांची गरज असताना बाद झाला. पण अखेरीस अब्दुल सामद आणि सनवीरने हैदराबादला विजयापर्यंत पोहचवलं.

दरम्यान पंजाबकडून गोलंदाजीत अर्शदीप आणि हर्षल पटेल यांनी 2-2 विकेट्स घेतल्या. पंजाबला या सामन्यात खराब फील्डिंगचाही फटका बसला.

असं असलं तरी लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की या सामन्यात शिखर धवन अन् सॅम करन यांच्या अनुपस्थितीत जितेश शर्माने पंजाबचे नेतृत्व केलेलं, तर पंजाबने प्लेइंग इलेव्हनमध्ये केवळ रिली रुसौ या एकमेव परदेशी खेळाडूला खेळवलं होतं. त्यामुळे आयपीएलमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये फक्त एकच परदेशी खेळाडू खेळवणारा पंजाब पहिलाच संघ ठरला.

SRH | IPL 2024
RCB vs CSK सामन्याची क्रेज! लग्न सोडून नवरदेव भर मांडवात बघत बसला मॅच, Video व्हायरल

दरम्यान पंजाबने या सामन्यात टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतलेली. त्यानंतर पंजाबकडून प्रभसिमरन सिंगने 71 धावांची आक्रमक खेळीही केली. त्याला या सामन्यात संधी मिळालेल्या अर्थर्व तायडेने 46 आणि रिली रुसौने 49 धावा करत चांगली साथ दिली. अखेरीस जितेशने आक्रमक खेळत 32 धावा केल्या. त्यामुळे पंजाबने 214 धावा उभारल्या होत्या.

दरम्यान आता आयपीएलमधील साखळी फेरी संपली असल्यानं आता या आठवड्यात प्लेऑफचा थरार सुरू होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com