PBKS vs MI: मिस्टर ३६० चा कडक शॉट अन् प्रभसिमरनचा भन्नाट झेल! पंजाबविरुद्ध सूर्याचं शतक कसं हुकलं

इंडियन प्रीमियर लीगचा ३३ वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या दोन संघांमध्ये खेळला गेला. सामन्यात मुंबईने पंजाबला ९ धावांनी पराभूत केले. मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आपल्या शतकाला अवघ्या २२ धावा हव्या असतानाच बाद झाला. त्याला प्रभसिमरन सिंगने शानदार कॅच घेत बाद केले.
MI VS PBKS
MI VS PBKSsakal

IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीगचा ३३ वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या दोन संघांमध्ये खेळला गेला. सामन्यात मुंबईने पंजाबला ९ धावांनी पराभूत केले. मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आपल्या शतकाला अवघ्या २२ धावा हव्या असतानाच बाद झाला. त्याला प्रभसिमरन सिंगने शानदार कॅच घेत बाद केले.

पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने ५३ चेंडूत ७८ धावा केल्या, ज्यामध्ये त्याने ७ चौकार आणि ३ षटकार लगावले. त्याने १७ व्या षटकात पंजाबचा कर्णधार सॅम करन गोलंदाजी करत होता, तेव्हा त्याने टाकलेल्या चेंडूवर कडक शाॅट मारला. चेंडू पाॅइंट क्षेत्रात उभ्या असलेल्या प्रभसिमरनला पास करुन पुढे जात होता, परंतु त्याने हवेत उडी मारत शानदार कॅच पकडला. सूर्यकुमारला देखील त्याच्या या कॅचवर विश्वास बसत नव्हता.

मुंबईचा दणदणीत विजय

सामन्यात पंजाबने टाॅस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने २० षटकात ७ गडी गमावत १९२ धावा केल्या. सुर्यकुमारशिवाय रोहित शर्माने २५ चेंडूत ३६ धावांची दमदार खेळी खेळली. तसेच तिलक वर्माने १८ चेंडूत ३४ धावा केल्या, तर कर्णधार हार्दिक पंड्याने १० तर टिम डेविडने १४ धावांची खेळी खेळली. पंजाबकडून हर्षल पटेलने ३ विकेट घेतल्या, तर सॅम करनने २ आणि कगिसो रबाडाने एक विकेट घेतली.

लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबकडून आशुतोष शर्माने २८ चेंडूत ६१ धावा केल्या, तर शशांक सिंगने ४१ आणि हरप्रीत ब्रारने २१ धावा केल्या. पंजाबने १८३ धावांवरच सर्व विकेट गमावल्या आणि संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईकडून जेराल्ड कोएत्झी ३, जसप्रीत बुमराह ३ तर आकाश माधवाल, हार्दिक पंड्या आणि श्रेयस गोपाल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

MI VS PBKS
IPL 2024 CSK vs LSG : लखनौसमोर चेन्नईचे आव्हान ; शिवम दुबे-रवी बिश्‍नोईमधील द्वंद्वाची उत्सुकता शिगेला

मुंबई गुणतालिकेत गुजरातला मागे टाकत सातव्या क्रमांकावर आली आहे. मुंबईने आत्तापर्यंत ७ सामने खेळले आहेत, त्यापैकी ३ सामने संघाने जिंकले आहेत. तर पंजाब गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे. पंजाबने ७ सामने खेळले आहेत, त्यापैकी २ सामन्यात संघाने विजय मिळवला आहे.

MI VS PBKS
IPL 2024 : स्ट्राईक रेटच्या बाबतीत सर्वात गरीब कोण?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com