IPL 2024 MI vs RR : मुंबईच्या फलंदाजीचे बुरूज ढासळले ; घरच्या मैदानावर निराशाजनक हार

एकापेक्षा एक नावाजलेले फलंदाज अशी भरभक्कम तटबंदी असलेल्या मुंबई इंडियन्सच्या याच फलंदाजीचे बुरूज ढासळले आणि वानखेडे स्टेडियमवर राजस्थाविरुद्धच्या आयपीएल सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
IPL 2024 MI vs RR
IPL 2024 MI vs RR sakal

मुंबई : एकापेक्षा एक नावाजलेले फलंदाज अशी भरभक्कम तटबंदी असलेल्या मुंबई इंडियन्सच्या याच फलंदाजीचे बुरूज ढासळले आणि वानखेडे स्टेडियमवर राजस्थाविरुद्धच्या आयपीएल सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. सलग तिसऱ्या अपयशामुळे गुणफलकासमोरचा भोपळा कायम राहिला. रोहित शर्मासह सुरुवातीचे तीन फलंदाज शून्यावर बाद झाले तेथून सुरू झालेली पडझड २० षटकांत नऊ बाद १२५ धावांपर्यंत कायम राहिली. राजस्थानने हे माफक आव्हान सहा विकेट आणि २७ चेंडू राखून पार केला आणि सलग तिसरा विजय मिळवला.

१० संघांच्या आयपीएलमध्ये इतर नऊ संघांनी एक तरी विजय मिळवला आहे. अपवाद मात्र पाच वेळा अजिंक्यपदाचा लौकिक असलेल्या मुंबईचा आहे. तिन्ही सामने गमावल्यामुळे गुणांचे खाते उघडलेले नाही. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांची बेदम पिटाई झाली होती. आज राजस्थानविरुद्ध फलंदाजांनी शरणागती स्वीकारली. एकूणच मुंबई इंडियन्स संघाची वाताहत कायम राहिली.

IPL 2024 MI vs RR
IPL 2024 MI vs RR : हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईचा सलग तिसरा पराभव! राजस्थानची विजयाची 'हॅटट्रिक'

१२५ या धावसंख्येवर विजय मिळवणे तसे कठिणच; पण एमफाकाने पहिल्याच षटकात यशस्वी जयस्वालला बाद करून सुरुवात चांगली केली होती. त्यानंतर अगोदरच्या सामन्यात केलेली चूक टाळताना बुमराला सुरुवातीपासून आक्रमणावर लावले. त्याने तीन षटकांत भेदक मारा केला; परंतु विकेट मिळाली नाही.

आज संधी मिळालेल्या आकाश मधवालने संजू सॅमसन आणि जोस बटलरच्या विकेट मिळवल्या; परंतु तोपर्यंत राजस्थानने अर्धशतकाजवळ मजल मारली होती. रियान परागने नाबाद ५४ धावांची खेळी साकार केली, त्यामुळे राजस्थानने १५.३ षटकांतच विजय साकार केला.ईशान किशनने १४ चेंडूत १६ धावा फटकावल्या खऱ्या; परंतु ज्या नांद्रे बर्गरच्या एका षटकात त्याने ही टोलेबाजी केली त्याच्या पुढच्या षटकांत ईशानही परतला.

अगोदरच प्रेक्षकांचा विरोध सहन करणारा आणि संघाची फारच वाईट अवस्था अशा परिस्थितीत मैदानात येणाऱ्या हार्दिकने दडपण उडवत सहा चौकारांसह ३४ धावा केल्या. तिलक वर्मासह ३६ चेंडूत ५६ धावांची भागीदारी केली. संघाच्या फलंदाजीला पडलेले मोठे छिद्र बुजवण्याचा प्रयत्न केला; पण युझवेंद्र चहलच्या चेंडूवर उंच फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला. तिलक वर्मा चहलच्या गुगलीवर चकला, त्यावेळी मुंबई इंडियन्सने सातवा फलंदाज गमावला, तोपर्यंत तीन अंकी धावाही खात्यात जमा झाल्या नव्हत्या. अखेर १५व्या षटकांत शंभरी गाठण्यात आली. टीम डेव्हिड आणि जेरार्ड कोएत्झी ही फलंदाजांची शेवटची मैदानात होती; पण त्यांचाही बार फुसका ठरला.

बोल्टकडून ‘नटबोल्ट’ टाईट

बोल्ट हा पूर्वाश्रमीचा मुंबई इंडियन्स संघातील खेळाडू; पण त्यानेच आज मुंबई संघाचे नटबोल्ट ढिले केले. हिरवे गवत असलेल्या खेळपट्टीवर नव्या चेंडूवर बोल्ट धोकादायक ठरणार हे निश्चित होते आणि घडलेही तसेच आऊट स्विंग झालेल्या चेंडूवर रोहित चकला. त्यानंतर बघता बघता मुंबईची अवस्था चार बाद २० अशी झाली होती. रोहितला बाद केल्यानंतर बोल्टने पुढच्याच चेंडूवर नमन धीरला पायचीत टिपले. डेवाल्ड ब्रेविसला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आले; परंतु तोही रोहित, नमनप्रमाणे पहिल्याच चेंडूवर बाद झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com