IPL 2024 MI vs RR : हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईचा सलग तिसरा पराभव! राजस्थानची विजयाची 'हॅटट्रिक'

IPL 2024 MI vs RR Score Updates Match News : आयपीएल 2024 चा चौदावा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला आहे.
IPL 2024 MI vs RR Score Updates Match News
IPL 2024 MI vs RR Score Updates Match News sakal

Mumbai Indians vs Rajasthan Royals Scorecard Updates : आयपीएल 2024 चा चौदावा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला आहे. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच खराब झाली. 20 षटकांत 9 गडी गमावून संघाला केवळ 125 धावा करता आल्या. कर्णधार हार्दिक पंड्याने सर्वाधिक 34 धावा केल्या. संजूच्या संघाने सहा विकेट्स शिल्लक असताना पूर्ण केले. आणि आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आणि सहा गुणांसह गुणतालिकेत पहिले स्थान गाठले आहे. त्याचबरोबर मुंबईला या स्पर्धेत आतापर्यंत पहिला विजय मिळवता आलेला नाही आणि ती 10व्या स्थानावर आहे.

IPL 2024 MI vs RR Live Score : राजस्थानची पडली तिसरी विकेट, संजूपाठोपाठ बटलरही आऊट

राजस्थानला तिसरा धक्का बसला आहे, कर्णधार संजू सॅमसन पाठोपाठ जोस बटलर आऊट झाला आहे. राजस्थानचा कर्णधार संजू 12 धावा करून झाला. त्याला आकाश मधवालने आऊट केले. तर दुसऱ्याच षटकात तो आकाश मधवालने 13 धावांवर जोस बटलरला आऊट केले. विचंद्रन अश्विन पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आहे. त्याचवेळी रियान पराग चार धावा करून नाबाद खेळत आहे. सात षटकांनंतर संघाची धावसंख्या ५०/३ आहे.

IPL 2024 MI vs RR Live Score : राजस्थान तुफानी सुरूवात... कर्णधार पांड्याने सोडला बटलर कॅच

पहिली विकेट पडल्यानंतर राजस्थान रॉयल्स तुफानी सुरूवात केली आहे. यादरम्यान कर्णधार पांड्याने बटलर कॅच सोडला. आता 4 षटकानंतर राजस्थानच्या धावा 41 वर एक विकेट आहे.

IPL 2024 MI vs RR Live Score : राजस्थानला 10 धावांवर बसला पहिला धक्का

राजस्थानला पहिला धक्का 10 धावांवर बसला आहे. क्विन माफाकाने पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर यशस्वी जैस्वालला बाद केले. त्याला केवळ 10 धावा करता आल्या. संजू सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आहे.

IPL 2024 MI vs RR Live Score : संजूचा हार्दिक पांड्यावर हल्ला बोल! मुंबईने राजस्थानला दिले 126 धावांचे लक्ष्य

राजस्थान रॉयल्सविरुद्ध मुंबई इंडियन्सचा संघ खूप फ्लॉप ठरला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघाने 20 षटकात 9 गडी गमावून 125 धावा केल्या आणि मुंबईसमोर 126 धावांचे माफक लक्ष्य ठेवले. या सामन्यात मुंबईच्या टॉप ऑर्डरची कामगिरी निराशाजनक होती.

IPL 2024 MI vs RR Live Score : मुंबईला बसला आठवा धक्का

गेराल्ड कोएत्झीच्या रूपाने मुंबईला आठवा धक्का बसला. चहलने त्याला आऊट केले. त्याला केवळ चार धावा करता आल्या. सध्या टीम डेव्हिड आणि जसप्रीत बुमराह क्रीजवर आहेत. 17 षटकांनंतर संघाची धावसंख्या 112/8 आहे.

IPL 2024 MI vs RR Live Score : संजूचा हार्दिक पांड्यावर हल्ला बोल! मुंबईची बॅटिंग ऑर्डर फ्लॉप

या सामन्यात मुंबईचा कणा म्हणून उभा राहिलेला तिलक वर्माही बाद झाला. युझवेंद्र चहलने त्याला आपला बळी बनवले. 29 चेंडूत 32 धावा करून युवा फलंदाज माघारी परतला. सध्या टीम डेव्हिड आणि जेराल्ड कोएत्झी क्रीजवर आहेत. 14 षटकांनंतर संघाची धावसंख्या 97/7 आहे.

IPL 2024 MI vs RR Live Score : संजूचा मुंबई इंडियन्सवर हल्ला बोल...! हार्दिक पांड्या इतक्या धावा करून झाला आऊट

या सामन्यात पहिल्या १० षटकात राजस्थान रॉयल्सचा दबदबा पाहिला मिळत आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या 34 धावांवर आऊट झाला. चहलने त्याची विकेट घेतली.

IPL 2024 MI vs RR Live Score : मुंबईची हालत खराब...., अवघ्या 20 धावांत पडल्या 4 विकेट, तीन खेळाडू शुन्यावर तंबूत

या सामन्यात राजस्थान रॉयल्सचे गोलंदाज धुमाकूळ घालताना दिसत आहेत. त्यामुळे मुंबईची हालत खराब झाली आहे. नांद्रे बर्जरने 29 धावांवर इशान किशनला बाद केले. या सामन्यात त्याला 16 धावा करता आल्या. हार्दिक पंड्या सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.

IPL 2024 MI vs RR Live Score : 0,0,0.... मुंबईचे ३ खेळाडू शुन्यावर तंबूत

ट्रेंट बोल्टने 14 धावांवर मुंबई इंडियन्सला तिसरा धक्का दिला. त्याने दुसऱ्याच षटकात डेव्हॉल्ड ब्रुईसलाही बाद केले. ब्रेव्हिसही गोल्डन डकचा बळी ठरला. तिलक वर्मा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आले आहेत. तीन षटकांनंतर संघाची धावसंख्या 16/3 आहे.

IPL 2024 MI vs RR Live Score : पहिल्याच षटकात सलग 2 चेंडूंत मुंबईला 2 धक्के, रोहित-नमन शुन्यावर तंबूत

मुंबई इंडियन्सची सुरुवात धक्कादायक झाली आहे. रोहित शर्मा आणि नमन धीरला ट्रेंट बोल्टने दोघेही खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले. सध्या इशान किशन आणि डेवाल्ड ब्रेविस क्रीजवर आहेत.

 IPL 2024 MI vs RR Live Score : जाणून घ्या दोन्ही संघाची Playing-11

मुंबई इंडियन्स : इशान किशन, रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह, क्वान माफाका.

राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल.

IPL 2024 MI vs RR Live Score : संजूने मुंबईविरुद्ध नाणेफेक जिंकली

राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संदीप शर्मा या सामन्यात खेळताना दिसणार नाही. त्यांच्या जागी नांद्रे बर्जर यांना संधी मिळाली आहे. तर मुंबई इंडियन्स कोणताही बदल न करता खेळताना दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com