IPL 2024 Points Table Update after DC vs SRH IPL 2024 Match News Marathi
IPL 2024 Points Table Update after DC vs SRH IPL 2024 Match News Marathisakal

IPL 2024 Points Table : हैदराबादने एका दगडात मारले 3 पक्षी; दिल्लीसह CSK अन् 'या' संघाला बसला मोठा धक्का!

DC vs SRH IPL 2024 Points Table : सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पुन्हा एकदा हाय स्कोअरिंग सामना पाहायला मिळाला. या सामन्यात हैदराबादने पुन्हा एकदा तुफान खेळी केली.

DC vs SRH IPL 2024 Points Table : सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पुन्हा एकदा हाय स्कोअरिंग सामना पाहायला मिळाला. या सामन्यात हैदराबादने पुन्हा एकदा तुफान खेळी केली. विशेष बाब म्हणजे पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबादने यावर्षी तिसऱ्यांदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 263 धावांचा विक्रम मोडला आहे.

दिल्ली फिरोजशाह कोटला स्टेडियमवर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्या नावाचे वादळ पाहिला मिळाले. दोन्ही फलंदाजांनी मिळून केवळ पॉवरप्लेमध्ये 125 धावा ठोकल्या. आणि हैदराबादने दिल्लीला विजयासाठी 267 धावांचे लक्ष्य ठेवले होते, मात्र दिल्लीने हा सामना 67 धावांनी गमावला. विशेष म्हणजे हैदराबादने दिल्लीला हरवून एका दगडात 3 पक्षी मारले आहेत.

IPL 2024 Points Table Update after DC vs SRH IPL 2024 Match News Marathi
Dinesh Karthik T20 World Cup : दिनेश कार्तिक टी-20 वर्ल्ड कप खेळणार? IPL दरम्यान केलं मोठं वक्तव्य

तसं पाहायला गेला तर आता हैदराबाद सहज प्लेऑफसाठी पात्र ठरू शकेल. पॉइंट टेबलमध्ये एसआरएचचे स्थान बऱ्यापैकी मजबूत झाले आहे. या सामन्यापूर्वी हैदराबाद 6 सामन्यांपैकी 4 विजयांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर होता, परंतु आता दिल्लीला पराभूत केल्यानंतर 7 सामन्यांपैकी 5 विजयांसह ते थेट दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत.

हैदराबादच्या पुढे फक्त राजस्थान रॉयल्स आहे. दुसरीकडे, या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स 7 पैकी 3 सामने जिंकून सहाव्या स्थानावर होती, आता हैदराबादविरुद्धच्या दारुण पराभवानंतर ते सातव्या स्थानावर घसरले आहेत. मुंबई इंडियन्स दिल्लीच्या पुढे सहाव्या स्थानावर आली आहे. अशात हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर दिल्लीलाच नव्हे, तर अन्य दोन संघांनाही मोठा धक्का बसला आहे.

IPL 2024 Points Table Update after DC vs SRH IPL 2024 Match News Marathi
IPL 2024 : 2011 मध्येच नारायणबाबत हा अंदाज लावला...; गंभीरने कॅरेबियन स्टारबद्दल केलं अनेक खुलासे

दिल्लीला पराभूत करण्यासोबतच हैदराबादने चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सलाही धक्का दिला आहे. या सामन्यापूर्वी केकेआर दुसऱ्या स्थानावर होता, मात्र आता हैदराबाद दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहे.

केकेआर आता गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. याशिवाय चेन्नई सुपर किंग्स या सामन्यापूर्वी 7 सामन्यांपैकी 4 विजयांसह तिसऱ्या स्थानावर होते, परंतु आता ते चौथ्या स्थानावर गेली आहे. अशा स्थितीत हैदराबादने दिल्लीबरोबरच केकेआर आणि सीएसकेचेही नुकसान केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com