Dinesh Karthik T20 World Cup : दिनेश कार्तिक टी-20 वर्ल्ड कप खेळणार? IPL दरम्यान केलं मोठं वक्तव्य

आयपीएल 2024 मध्ये शानदार फलंदाजी करणाऱ्या दिनेश कार्तिकने अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप 2024 संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.
Rohit Sharma on Dinesh Karthik T20 World Cup
Rohit Sharma on Dinesh Karthik T20 World Cup Newssakal

Dinesh Karthik Want to Play T20 World Cup 2024 : आयपीएल 2024 मध्ये शानदार फलंदाजी करणाऱ्या दिनेश कार्तिकने अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप 2024 संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. येत्या टी-२० वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय निवड समितीने आपला विचार केला तर आपण १०० टक्के तयार आहोत, असा विश्वास दिनेश कार्तिकने व्यक्त केला

Rohit Sharma on Dinesh Karthik T20 World Cup
KKR vs RCB : बंगळूरसाठी आता चुकीला माफी नाही...! ताकदवर गंभीरच्या कोलकताविरुद्ध सामना

या आयपीएलमध्ये कमालीचा फॉर्म दाखवणाऱ्या कार्तिकने यष्टीरक्षणासह फलंदाजीतही चांगली कामगिरी केली आहे. वास्तविक ही आपली अखेरची आयपीएल असल्याचे त्याने अगोदर जाहीर केले होते; परंतु यंदाचा फॉर्म पाहता देशाकडून खेळण्याची त्याची इच्छा जागृत झाली आहे.

Rohit Sharma on Dinesh Karthik T20 World Cup
T20 World Cup साठी टीम इंडियाच्या निवडीबाबत मोठी अपडेट! 'या' दिवशी होणार संघाची घोषणा, BCCI ने बोलावली तातडीची बैठक

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा १ जूनपासून सुरू होत आहे. या दरम्यान ३९ वर्षांचा होणारा कार्तिक २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या गतवेळच्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळला होता. त्यात समाधानकारक कामगिरी न झाल्यामुळे संघातून वगळण्यात आलेल्या कार्तिकने नंतर समालोचनाचे काम केले आहे.

Rohit Sharma on Dinesh Karthik T20 World Cup
LSG vs CSK IPL 2024 : धोनीचे मैदानात येणे 'कानांसाठी' खतरनाक; मॅच संपल्यानंतर मिळाली मोठी वॉर्निंग

या आयपीएलमध्ये त्याने २०५ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातही त्याने काही सफाईदार फटके मारले होते. त्यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्माने कार्तिक विश्वकरंडक स्पर्धेची तयारी करत आहे, असे हसत हसत सांगितले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com