IPL 2024 SRH vs GT Rain : हैदराबाद - गुजरात सामन्यात पावसाची शक्यता... सीएसके अन् आरसीबीला फुटला घाम

IPL 2024 SRH vs GT Rain
IPL 2024 SRH vs GT Rain esakal

IPL 2024 SRH vs GT : आयपीएल 2024 मध्ये आज सनराईजर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होत आहे. या सामन्यावर हैदराबादचं प्ले ऑफचं तिकीट अवलंबून आहे. या सामन्याचा निकाल प्ले ऑफच्या गणितांवर मोठा परिणाम करणार आहे. सध्या कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे प्ले ऑफसाठी पात्र झाले आहेत. सध्या हैदराबाद, आरसीबी आणि सीएसकेला प्ले ऑफ गाठण्याची उत्तम संधी दिसत आहे. तर दिल्ली अन् लखनौच्या आशा जवळपास मावळल्या आहे.

IPL 2024 SRH vs GT Rain
IPL Playoffs : IPL प्लेऑफ समीकरण, 2 जागीसाठी 5 संघ भिडणार, जाणून घ्या कोणाचा रस्ता आहे सोपा?

सीएसकेने 13 सामन्यात 14 पॉईंट मिळवले असून त्यांचे नेट रनरेट +0.528 इतके आहे. तर आरसीबीने 13 सामन्यात 12 गुण मिळवले आहेत. त्यांचे नेट रनरेट (+0.387) देखील चांगले आहे. सनराईजर्स हैदराबादने आतापर्यंत 12 सामने खेळले असून त्यात त्यांचे 14 गुण झाले आहेत. त्यांचे नेट रनरेट +0.406 इतके आहे.

हैदराबाद दोन सामने खेळणार असून आज गुजरातविरूद्ध आणि रविवारी पंजाब किंग्जसोबत त्यांचा सामना होणार आहे. त्यांनी दोन पैकी एक सामना जरी जिंकला तरी त्याचे प्ले ऑफचे तिकीट निश्चित होईल. जर आरसीबी आणि सीएसकेला प्ले ऑफसाठी पात्र होण्यासाठी हैदराबादला त्यांचे दोन्ही सामने गमवावे लागतील त्यानंतर गणित नेट रनरेटवर येईल.

मात्र आरसीबी आणि सीएसकेपुढे अजून एक मोठी समस्या आहे. हैदराबादमध्ये सध्या जोरदार पाऊस पडत आहे. हैदराबादमध्ये सध्याकाळी जवळापस 50 टक्के पावसाची शक्यता आहे.

IPL 2024 SRH vs GT Rain
Sunil Chhetri Net Worth: ऑडी, फॉर्च्युनर सारख्या कारचा मालक, बेंगळुरूमध्ये आलिशान घर; फुटबॉलपटू सुनील छेत्रीची संपत्ती किती?

तर आरसीबी, सीएसके अडचणीत

जर गुजरात टायटन्स अन् हैदराबादचा सामना पावसामुळे रद्द झाला तर सीएसके आणि आरसीबीसाठी ते मोठे अडचणीचे होणार आहे. कारण सामना रद्द झाला तर हैदराबादला एक गुण मिळेल. याचा अर्थ त्यांचे 15 गुण होतील अन् ते प्ले ऑफसाठी पात्र होतील.

अशा परिस्थितीत आरसीबी आणि सीएसके यांच्यातील सामना हा थेट नॉक आऊट होईल. जो सामना जिंकेल तो प्ले ऑफमध्ये पोहचणार आहे. आरसीबी आणि सीएसके दोघांचे 14 गुण झाले आहेत. आरसीबीला प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी सामना जिंकून नेट रनरेट हे सीएसकेपेक्षा वरचढ ठेवावे लागले.

सीएसकेला प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी विजय गरजेचा आहे. मात्र ते जरी हरले तरी प्ले ऑफमध्ये जाऊ शकतात. फक्त त्यांची हार ही मोठ्या मार्जिनची नसावी. जेवढ्या कमी मार्जिनने सीएसके सामना हरले तेवढा त्यांचा फायदा होणार आहे. अशा परिस्थितीत त्यांचे नेट रनरेट हे आरसीबीपेक्षा सरस राहू शकतं. ते चौथ्या स्थानानिशी प्ले ऑफचं तिकीट मिळवतील.

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com