IPL 2024 : नाद करा पण आमचा कुठं! RCBनं विजयाचा 'पंच' मारला तरी कसा? संघाच्या हुकमी एक्क्यानेच केलाय खुलासा

IPL 2024 Playoffs Race RCB vs CSK : इंडियन प्रीमिअर लीग 2024 स्पर्धा अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेत अनेक बलाढ्य समजले जाणारे संघ खराब प्रदर्शन करून तोंडघशी पडले, तर काही संघांनी चमकदार कामगिरी करत आपला डंका वाजवला.
IPL 2024 Playoffs Race RCB vs CSK
IPL 2024 Playoffs Race RCB vs CSKsakal

IPL 2024 Playoffs Race RCB vs CSK : इंडियन प्रीमिअर लीग 2024 स्पर्धा अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेत अनेक बलाढ्य समजले जाणारे संघ खराब प्रदर्शन करून तोंडघशी पडले, तर काही संघांनी चमकदार कामगिरी करत आपला डंका वाजवला. चमकदार कामगिरी करणाऱ्या संघांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या नावाचाही समावेश आहे.

IPL 2024 Playoffs Race RCB vs CSK
Team India Head Coach : टीम इंडिया नवीन कोचच्या शोधात; पगारापासून ते वयापर्यंत, BCCIने ठेवल्या 'या' कडक अटी

पहिल्या टप्प्यात खराब कामगिरी करणाऱ्या आरसीबीने दुसऱ्या टप्प्यात मात्र जबरदस्त पुनरागमन केले. त्यांनी पहिल्या टप्प्यात सातपैकी फक्त एक सामना जिंकला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी दमदार पुनरागमन करत सलग पाच सामन्यात दणदणीत विजय नोंदवला. याच कामगिरीमुळे आरसीबी अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. अशात आरसीबीच्या प्रमुख गोलंदाजाने संघाच्या शानदार प्रदर्शनामागील रहस्याचा उलगडा केला आहे.

रविवारी (दि. 12 मे) आयपीएल 2024 हंगामातील 62 व्या सामन्यात आरसीबीने दिल्ली कॅपिटल्स संघाला 47 धावांनी पराभवाचा धक्का दिला. तसेच, चालू हंगामातील आपला सहावा आणि सलग पाचवा विजय नोंदवला. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी आरसीबी संघाला त्यांचा अंतिम सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. तसेच, इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागेल.

IPL 2024 Playoffs Race RCB vs CSK
IPL 2024 Playoffs : प्लेऑफच्या शर्यतीतून 3 संघ बाहेर, 1 क्वालिफाय, 'या' 6 संघाचे मालक टेन्शनमध्ये

काय म्हणाला स्टार गोलंदाज?

दिल्लीच्या धुरंधरांना पराभूत केल्यानंतर माध्यमांशी बोलताना आरसीबीचा वेगवान गोलंदाज यश दयाल याने संघाच्या शानदार पुनरागमनासाठी आक्रमक खेळाला श्रेय दिले. तो म्हणाला,"एक सकारात्मक बदल झाला आहे. एवढंच काय, तर जेव्हा आम्ही पराभूत होत होतो, तेव्हाही कोणी कुणाला दोष देत नव्हते. हे सहयोगी वातावरण, एक नवीन आक्रमक अप्रोचसह, यातून आरसीबीच्या विजयाचा फॉर्म्युला समोर येतो. संपूर्ण हंगामात आम्ही सकारात्मक राहिलो आणि आता आम्ही आणखी जास्त आक्रमक झालो आहोत."

IPL 2024 Playoffs Race RCB vs CSK
Virat Kohli : विराट कोहली पुन्हा होणार कर्णधार..? 'या' दिग्गज खेळाडूनं केलं मोठं वक्तव्य

आरसीबीचा पुढील सामना सीएसकेविरुद्ध

आरसीबीच्या पुढील सामन्याविषयी बोलायचं झालं, तर संघ त्यांचा अंतिम साखळी सामना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळणार आहे. हा सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर 18 मे रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यात जर आरसीबीने सीएसकेला मोठ्या अंतराने पराभूत केले, तर त्यांच्याकडे प्लेऑफमध्ये जाण्याची संधी असेल. मात्र, सामन्यात काय होतं, हे येणारा काळच सांगेल. क्रिकेटप्रेमींच्या नजरा या सामन्यावर लागल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com