Ranji Trophy 2024 Final : भावाने सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड मोडताच सर्फराज म्हणाला शेर भुका हैं!

Ranji Trophy 2024 Final : रणजी ट्रॉफी फायनल सामन्यात सर्फराज खानचा भाऊ मुशीर खानने 136 धावांची धडाकेबाज खेळी करत विजयात मोलाचा वाटा उचलला.
Ranji Trophy 2024 Final Musheer Khan
Ranji Trophy 2024 Final Musheer Khanesakal

Ranji Trophy 2024 Final Musheer Khan : वानखेडे स्टेडियमवर झालेल्या रणजी ट्रॉफी 2024 च्या फायनलमध्ये मुंबईने विदर्भचा पराभव करत तब्बल 42 वे रणजी विजेतेपद पटकावले. फायनल सामन्यात सर्फराज खानचा भाऊ मुशीर खानने 136 धावांची धडाकेबाज खेळी करत विजयात मोलाचा वाटा उचलला. यावेळी त्याने सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड देखील मोडले.

Ranji Trophy 2024 Final Musheer Khan
IPL 2024 : जागे व्हा! बाबर, शाहीन आयपीएलमध्ये...स्वप्न पाहणाऱ्यांची हरभजनने काढली खरडपट्टी

मुशीर खानने विदर्भविरूद्धच्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 326 चेंडूत 136 धावांची खेळी केली. त्यात त्याने 10 चौकार मारले. यामुळे मुंबईला 500 पेक्षा जास्त धावांची लीड मिळवता आली. याचबरोबर मुशीर खान हा मुंबईचा रणजी ट्रॉफी फायनलमध्ये शतक ठोकणारा सर्वात कमी वयाचा फलंदाज ठरला. यापूर्वी हे रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर होते. 19 वर्षाच्या मुशीरने रणजी ट्रॉफी फायनलमध्ये 255 चेंडूत शतक ठोकले.

सचिन तेंडुलकरने 1994-95 च्या रणजी ट्रॉफी फायनल सामन्यात पंजाबविरूद्ध शतक ठोकले होते. त्यावेळी तो 22 वर्षाचा होता. मुशीर खानने 19 वर्षे आणि 14 दिवस वय असताना हा कारनामा करून दाखवला. यानंतर सर्फराज खानने इन्स्टाग्रामवर शेर भुका हैं अशी स्टोरी ठेवत आपल्या धाकट्या भावाची पाठ थोपटली.

Ranji Trophy 2024 Final Musheer Khan
ICC Stop Clocks Rule : आयसीसीचा नवा 'स्टॉप क्लॉक' नियम आहे तरी काय, कधीपासून होणार अंमलबजावणी?

मुशीर खानने रणजी ट्रॉफी सेमी फायनल सामन्यात तमिळनाडूविरूद्ध महत्वपूर्ण खेळी केल्या. त्याने 131 चेंडूत 55 धावांची खेळी केली. त्यात सहा चौकारांचा समावेश होता. याच सामन्यात शार्दुल ठाकूरने देखील काऊंटर अटॅक करत शतकी खेळी केली होती. यामुळे मुंबईला 232 धावांची आघाडी मिळाली. मुंबईने हा सामना 70 धावांनी जिंकला होता.

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com