MI विरुद्ध पराभवानंतर RCB च्या नावावर नोंदवला लाजिरवाणा विक्रम!

इंडियन प्रीमियर लीगमध्ये फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली आरसीबी संघाला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. बंगळुरूचा या हंगामातील हा ५ वा पराभव आहे. RCB ने आयपीएलच्या १७ व्या हंगामात आत्तापर्यंत ६ सामने खेळले आहेत परंतु संघाला एकाच सामन्यात यश आले आहे.
RCB team
RCB teamsakal

IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीगमध्ये फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली आरसीबी संघाला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. बंगळुरूचा या हंगामातील हा ५ वा पराभव आहे.

RCB ने आयपीएलच्या १७ व्या हंगामात आत्तापर्यंत ६ सामने खेळले आहेत परंतु संघाला एकाच सामन्यात यश आले आहे. त्याचबरोबर आरसीबीने या सामन्यात एका खराब रेकाॅर्डची नोंद सुद्धा आपल्या नावावर केली आहे.

मुंबईचा कर्णधार हार्दिकने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने पहिल्यांदा फलंदाजी करताना MI पुढे १९७ धावांचे आव्हान ठेवले. आरसीबीकडून फाफ डु प्लेसिस, रजत पाटीदार आणि दिनेश कार्तिकने अर्धशतकीय खेळी खेळली परंतु संघाला २०० हून अधिक रन्स करण्यात अपयश आले.

आयपीएल इतिहासात १० वेळा असे झाले आहे कि संघाने २०० हून अधिक स्कोर केला, ज्यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश होता.

आयपीएल इतिहासात पहिल्यांदा असे घडले आहे कि, ३ खेळाडूंनी अर्धशतके पूर्ण केली परंतु संघाला २०० पेक्षा जास्त रन्स करता आल्या नाहीत. त्यामुळे आरसीबी संघाने पहिल्यांदा अशी कामगिरी करत आयपीएल इतिहासातील सर्वात खराब विक्रम आपल्या नावी केला आहे.

RCB team
IPL 2024 : दिनेश कार्तिक खेळणार टी-20 वर्ल्ड कप? MI vs RCB सामन्यादरम्यान रोहित शर्माचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

मुंबई इंडियन्सने आयपीएल इतिहासात तिसऱ्यांदा १९० पेक्षा जास्त रन्सचा स्कोर जलद साध्य केला आहे. जलद स्कोर चेस करण्याच्या यादीत मुंबईच्या नावावर तीन रेकाॅर्ड आहेत. मुंबईने २०१४ साली राजस्थान राॅयल्सविरुद्धच्या सामन्यात १९० धावांचे लक्ष्य ३२ बाॅल शिल्लक ठेवून पूर्ण केले होते.

तर २०१७ साली पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात MI ने १९९ रन्सचे आव्हान २७ बाॅल राखून पूर्ण केले होते. तसेच आरसीबी विरुद्धच्या सामन्यात मुंबईने १९७ धावांचा स्कोर २७ बाॅल राखून पूर्ण केला आहे.

आरसीबीविरुद्ध विजय मिळवल्यानंतर मुंबई गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर पोहोचली आहे तर आरसीबी नवव्या क्रमांकावर आहे. मुंबई आपला पुढचा सामना १४ एप्रिलला वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळणार आहे. आरसीबी आपला पुढचा सामना १५ एप्रिलला एम चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरू येथे सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध खेळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com