IPL 2024: कोणाला गोलंदाज बनायचंय? SRH VS RCB सामन्यानंतर सचिन तेंडुलकरची ती पोस्ट चर्चेत

इंडियन प्रीमियर लीगमध्ये सोमवारी (१५ एप्रिल) झालेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध राॅयल चॅलेंजर्स बेंगळुरू या सामन्यात चूरशीची लढत पाहायला मिळाली. या सामन्यात हैदराबादने बेंगळुरूला २५ धावांनी पराभूत केले.
sachin tendulkar
sachin tendulkarsakal

Sachin Tendulkar Post: इंडियन प्रीमियर लीगमध्ये सोमवारी (१५ एप्रिल) झालेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध राॅयल चॅलेंजर्स बेंगळुरू या सामन्यात चूरशीची लढत पाहायला मिळाली. या सामन्यात हैदराबादने बेंगळुरूला २५ धावांनी पराभूत केले. सामन्यात दोन्ही संघांनी मिळून ५४९ धावा करत इतिहास रचला आहे. यावर भारताचा महान फलंदाज मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सचिन सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला की, "सनरायझर्स हैदराबाद आणि राॅयल चॅलेंजर्स बेंगळुरू या दोन्ही संघांनी पाॅवर हिटींगचे काय अविश्वासनीय प्रदर्शन केले. आज ४० षटकात ५४९ धावा झाल्या. कोणाला गोलंदाज बनायचं आहे?" सचिनच्या या पोस्टला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय.

एकंदरीत सचिनचा प्रश्नावर चर्चाही सुरू झाल्या आहेत, कारण पहिल्यांदा टी२० क्रिकेटमध्ये एवढ्या धावा झाल्या आहेत. आयपीएलचे अनेक विक्रम या सामन्यादरम्यान दोन्ही संघांनी मोडले आहेत. हैदराबादने सर्वाधिक २२ षटकार लगावले. अशी कामगिरी करत हैदराबादने बेंगळुरूचा एका सामन्यात सर्वात जास्त षटकार मारण्याचा विक्रम सुद्धा मोडला आहे.

हैदराबादचा दणदणीत विजय

बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २० षटकात ३ गडी गमावून २८७ धावा केल्या. ट्रेविस हेडने १०२ धावा करत आपले आयपीएलमधील पहिले शतक पूर्ण केले आहे. आरसीबीकडून लॉकी फर्ग्युसनने २, तर रीस टोपली याने १ विकेट घेतली.

आरसीबीला २० षटकात हे आव्हान पूर्ण करण्यात अपयश आले. आरसीबीला २० षटकात केवळ २६२ धावा करता आल्या. आरसीबीकडून दिनेश कार्तिकने ८३, तर कर्णधार फाफ डु प्लेसीसने ६२ धावा केल्या. हैदराबादकडून पॅट कमिन्सने ३ आणि मयंक मार्कंडेयने २ विकेट्स घेतल्या.

हैदराबादने आयपीएल २०२४ मध्ये ६ सामने खेळले आहेत, त्यापैकी दोन सामन्यात संघाला अपयश आले आहे. संघ आपल्या चार विजयांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे, तर आरसीबी गुणतालिकेत दहाव्या क्रमांकावर आहे. आरसीबीला या आयपीएलमध्ये काही खास कामगिरी करता आली नाही. संघ ७ पैकी ६ सामने हारला आहे.

sachin tendulkar
Sachin Tendulkar : अन् चेहऱ्यावर हास्य उमटलं... सचिन तेंडुलकरने शेअर केला काश्मिरी मुलीचा VIDEO

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com