यंदा IPL 2024 थरार रंगणार भारताबाहेर? अध्यक्षांनी दिली मोठी अपडेट

भारतामध्ये या वर्षी लोकसभा निवडणूक रंगणार...!
IPL 2024 News In Marathi
IPL 2024 News In Marathi sakal

IPL 2024 : भारतामध्ये या वर्षी लोकसभा निवडणूक रंगणार आहे. त्यामुळे याचे परिणाम आयपीएल या क्रिकेट स्पर्धेवर होण्याची शक्यता आहे. आयपीएल भारताबाहेर आयोजित करण्याची चर्चा रंगू लागली असताना या स्पर्धेचे चेअरमन अरुण धुमल यांनी बुधवारी स्पष्ट मत व्यक्त करताना म्हटले की, केंद्र सरकारशी संपर्क साधून आहोत. आयपीएल भारतातच खेळवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या तारखा निश्‍चित झाल्यानंतर आयपीएलच्या तारखा जाहीर करण्यात येतील.

IPL 2024 News In Marathi
Rohit Sharma T20 Captain : हार्दिक नाही तर रोहितच कर्णधार! खुद्द जय शहांनीच केलं स्पष्ट; पाहा VIDEO

अरुण धुमल पुढे सांगतात की, यंदाच्या मोसमात आयपीएलला मार्च महिन्यात सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. मार्च महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात या स्पर्धेला सुरुवात होईल. एप्रिल महिन्यात निवडणूक होण्याचे संकेत आहेत. निवडणुकांच्या तारखांनुसार आयपीएलचे वेळापत्रक ठरवण्यात येईल. विविध राज्यांतील निवडणुकीच्या तारखांनुसार आयपीएल स्थळांची निश्‍चिती करण्यात येईल.

IPL 2024 News In Marathi
Anmol Kharb Badminton : भारताची नवी 17 वर्षाची बॅडमिंटन स्टार अनमोल खाबर, पदार्पणाच्या सामन्यातच का आली चर्चेत?

टी-२० विश्‍वकरंडकाचे लक्ष्य

भारतीय क्रिकेट संघाने २०१३ नंतर आयसीसीकडून आयोजित करण्यात येणारी कोणतीही स्पर्धा जिंकलेली नाही. या वर्षी जून महिन्यात वेस्ट इंडीज येथे टी-२० विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. आयपीएल व टी-२० विश्‍वकरंडक या दोन्ही स्पर्धांमध्ये कमी कालावधी असणार आहे. बीसीसीआयला याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. मार्च महिन्यात आयपीएलला सुरुवात झाल्यास मे महिन्याच्या १८ ते २४ या दरम्यान ही स्पर्धा संपू शकते.

प्ले ऑफमध्ये न पोहोचलेल्या खेळाडूंना सरावासाठी पाठवणार

आयपीएल प्ले ऑफमध्ये न पोहोचलेल्या संघातील खेळाडूंना बीसीसीआयकडून न्यूयॉर्क येथे लवकर पाठवण्यात येणार आहे. टी-२० विश्‍वकरंडकाचे आयोजन अमेरिका व वेस्ट इंडीज येथे होणार आहे. भारतीय खेळाडूंना तेथील खेळपट्टी व वातावरणाशी जुळवून घेता यावे यासाठी बीसीसीआयकडून हे पाऊल उचलण्यात येणार आहे. मात्र जे संघ प्ले ऑफमध्ये पोहोचतील अशा संघातील खेळाडूंना आयपीएल संपल्यानंतर अमेरिकेत जाता येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com