
कोलकाताप्रमाणे बंगळूर संघाचेही त्यांच्या घरच्या मैदानावरील क्युरेटरशी बिनसले असल्याचे स्पष्ट होत आहे. गुरुवारी दिल्लीविरुद्धचा सामना गमावल्यानंतर बंगळूर संघाचा मेंटॉर दिनेश कार्तिकनेही थेट क्युरेटरवर नाराजी व्यक्त केली.
दोन दिवसांपूर्वी कोलकाता संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेनेही इडन गार्डनच्या क्युरेटरवर दुसऱ्यांदा टीका केली. आता दिनेश कार्तिकनेही चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी अपेक्षेप्रमाणे नसल्याचे थेट पत्रकार परिषदेतच सांगितले.