Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders : महेंद्रसिंग धोनी कर्णधारपदावर परतल्याने चेन्नई सुपर किंग्सचे नशीब बदलेल, पाच सामन्यांतील चार पराभवानंतर CSK चा संघ आज करिष्मा करून दाखवेल, अशी सर्व स्वप्न धुळीस मिळाली. कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांसमोर चेन्नईला २० षटकांत कशाबशा ९ बाद १०३ धावाच करता आल्या. शिवम दुबेने शेवटपर्यंत उभा राहून नाबाद ३१ धावा केल्या. पण, या सामन्यात MS Dhoni च्या विकेटने वादाला तोंड फोडले आहे. धोनी चेंडू बॅटला लागलाय असे सांगत होती आणि अल्ट्रा एजमध्ये स्पाईक दिसत होतं, तरीही अम्पयारने बाद दिल्याने सर्वांना आश्चर्य वाटले.