Rahane & Axar’s Funny Moment After Match Leaves Fans Confused : कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये मंगळवारी दिल्ली कॅपिटल्सवर १४ धावांनी विजय मिळवला. दिल्लीचा हा मागील चार सामन्यांपैकी तिसरा पराभव ठरला आणि त्यामुळे त्यांचे प्ले ऑफच्या शर्यतीचा मार्ग खडतर झाला आहे. KKR ने विजय मिळवून स्वतःला शर्यतीत अजूनही ठेवले आहे. कोलकाताच्या ९ बाद २०४ धावांचा पाठलाग करताना दिल्लीला ९ बाद १९० धावाच करता आल्या. या सामन्यानंतर अजिंक्य रहाणे व अक्षर पटेल या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी एकमेकांना हस्तांदोलन करणे टाळले..