Ajinkya Rahane reaction after KKR beat CSK in IPL 2025
चेन्नई सुपर किंग्स (CSK) ला त्यांच्या इंडियन प्रीमिअर लीगच्या इतिहासातील सर्वात लज्जास्पद पराभवाचा सामना करावा लागला. 'अनकॅप्ड' महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने आयपीएल २०२५ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना CSK ने २० षटकांत ९ बाद १०३ धावा केल्या आणि KKRने हा सामना १०.१ षटकांत २ बाद १०७ धावा करून जिंकला. या सामन्यानंतर कोलकाताचा कर्णधार अजिंक्य राहणेने दिलेल्या प्रतिक्रियेत डावपेच उलगडत गेले.