

Ajinkya Rahane vs Eden Gardens curator controversy: लखनौ सुपर जायंट्सने मंगळवारी ईडन गार्डनवर यजमान कोलकाता नाइट रायडर्सवर ४ धावांनी रोमहर्षक विजयाची नोंद केली. कोलकाताचा इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मधील हा पाच सामन्यांतील तिसरा, तर घरच्या मैदानावरील दुसरा पराभव ठरला. लखनौविरुद्धच्या सामन्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेला संताप अनावर झाला आणि त्याने पंगाच घेतला.