
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने जिंकून इतिहास रचला आहे. त्यांनी अंतिम सामन्यात पंजाब किंग्स संघाला मंगळवारी (३ जून) ६ धावांनी पराभूत करत पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले आहे. मात्र यामुळे पंजाब किंग्स संघाचे पहिल्या विजेतेपदाचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे.