Axar Patel blames bowlers for GT loss : इंडियन प्रीमियर लीगमध्ये रविवारी झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 10 गडी राखून धुव्वा उडवला. या विजयासह गुजरात टायटन्सने प्लेऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे. दुसरीकडे, या पराभवामुळे दिल्ली कॅपिटल्सचे आयपीएलमधील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. सामन्यानंतर दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल याने पराभवाचे खापर गोलंदाजांवर फोडले.