

इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये घरच्या मैदानाचा फायदा, या मुद्यावरून सध्या कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे व ईडन गार्डन्सचे क्युरेटर सुजन मुखर्जी यांच्यात तिखट संवाद सुरू आहे. दोघंही एकमेकांवर तारेशे ओढताना दिसत आहेत. अजिंक्यने मागील सामन्यात तीव्र नाराजी व्यक्त करताना क्युरेटला हवी तेवढी प्रसिद्धी मिळाली आहे, असा खोचक टोमणा हाणला. आता या प्रकरणार क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल ( CAB) कडून अध्यक्ष स्नेहाशिष गांगुली ( Snehasish Ganguly) यांनी उत्तर दिले आहे.