Video: १२ चौकार, ५ षटकार! Karun Nair सोबत जसप्रीत बुमराह कचाकचा भांडला; हार्दिक समजवायला आला, रोहित मजा घेताना दिसला

IPL 2025 DC vs MI Live : मिळालेल्या संधीचं सोनं कसं करायचं हे, करुण नायरने आज दाखवून दिले. मागील वर्षभर तो देशांतर्गत क्रिकेट गाजवतोय, परंतु टीम इंडियाला तो नकोसा झालाय. पण, त्याने आज आयपीएलमध्ये दिल्लीने दिलेल्या संधीवर दमदार कामगिरी केली.
KARUN NAIR AND JASPRIT BUMRAH HEATED MOMENT
KARUN NAIR AND JASPRIT BUMRAH HEATED MOMENT esakal
Updated on

Delhi Capitals vs Mumbai Indians Marathi News मुंबई इंडियन्सच्या प्रमुख गोलंदाजालाच टार्गेट करून दिल्ली कॅपिटल्सने निम्मी लढाई जिंकली. Karun Nair ने आयपीएल २०२५ मध्ये पुनरागमन करताना सात वर्षांनंतर अर्धशतक झळकावले. त्याने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर मोठ्या आत्मविश्वासाने फटके खेचले. जसप्रीतच्या २ षटकांत नायरने २९ धावा चोपल्या आणि त्यामुळे मुंबईचा गोलंदाज खवळला. या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळाली. कर्णधार हार्दिक पांड्याने मध्यस्थी करून करुणला बाजूला नेले, तेच रोहित शर्मा दूर उभा राहून याही सामन्याची मजा घेत होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com