Controversy in RCB vs RR: Ball Collected With Cap, No Penalty Given
इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुरुवारी राजस्थान रॉयल्सवर ११ धावांनी विजय मिळवून गुणतालिकेत आगेकूच केली. पण, या सामन्यातील एक वादग्रस्त घटना समोर आली आहे आणि अम्पायरने ते पाहूनही काहीच कारवाई न केल्याने सर्वांना आश्चर्य वाटत आहे. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर RCB vs RR सामन्यात सुयश शर्माने ( Suyash Sharma) नियम मोडला आणि कॅपने चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला. पण यासाठी आरसीबीवर कोणताही दंड आकारण्यात आला नाही आणि त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.