
IPL 2025 Chennai Super Kings vs Rajasthan Royals: चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या लढतीत राजस्थान रॉयल्सविरुद्ध आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. आयुष म्हात्रे व डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या फटकेबाजीला शिवम दुबे व महेंद्रसिंग धोनी यांची साथ मिळाली. राजस्थानच्या युधवीर सिंगने सुरुवातीला CSK ला धक्के दिले होते, परंतु चेन्नईने चांगले पुनरागमन केले.