Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders : कोलकाता नाइट रायडर्सने सर्वच आघाड्यांवर वर्चस्व गाजवताना चेन्नई सुपर किंग्सवर दणदणीत विजयाची नोंद केली. IPL 2025 मधील आजचा पराभव CSK चे चाहते कधीच विसणार नाही. जवळपास ६०० हून अधिक दिवसांनी कर्णधार म्हणून चेपॉकवर नेतृत्व करणाऱ्या MS Dhoni लाही चेन्नईचे नशीब बदलता आले नाही. KKR च्या गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीनंतर फलंदाजांनी सहज विजय मिळवून दिला.