Rishabh Pant's Delhi and MS Dhoni's Chennai clash in a thrilling IPL 2025 faceoff : पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावणारा चेन्नई सुपर किंग्सचा संघ यंदाच्या आयपीएल मोसमात सुमार कामगिरी करीत आहे. सलग पाच सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. ॠतुराज गायकवाडला दुखापत झाल्यानंतर आता महेंद्रसिंग धोनीकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. अशातच आज चेन्नई संघासमोर साखळी फेरीच्या लढतीत लखनऊ सुपर जायंट्सचे आव्हान असणार आहे. लखनऊ संघाने चार सामन्यांमध्ये विजय साकारले असून आता पाचव्या विजयासाठी रिषभ पंतची सेना प्रयत्न करताना दिसणार आहे.