CSK vs PBKS live: सॅम करनच्या वादळाला, Yuzvendra Chahal चे हॅटट्रिकने उत्तर! चेन्नई सुपर किंग्सची विझण्यापूर्वी फडफड, पंजाब किंग्सची वाढवली धडधड

IPL 2025 CSK vs PBKS Marathi Updates: सॅम करन आणि डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या फटकेबाजीने आज चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांना आनंदीत केले. पंजाब किंग्सच्या गोलंदाजांना इंग्लंडच्या करनने चांगले चोपले.
CSK vs PBKS IPL 2025
CSK vs PBKS IPL 2025esakal
Updated on

IPL Chennai Super Kings vs Punjab Kings Marahi Cricket News

इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद झालेल्या चेन्नई सुपर किंग्सकडे गमावण्यासाठी काहीच नाही. त्यामुळेच त्यांचे अचानक फॉर्मात येणे अन्य संघांचे गणित बिघडवणारे ठऱणार आहे. पंजाब किंग्स जो प्ले ऑफच्या जवळ आहे, त्यांना आज CSK ने चांगले दमवले. सॅम करन ( Sam Curran) ने वादळी खेळी करताना PBKS समोर मोठं आव्हान उभं केलं. त्याला डेवॉल्ड ब्रेव्हिसची चांगली साथ मिळाली आणि दोघांच्या ७८ धावांच्या भागीदारीने मॅचमध्ये रंजकता निर्माण केली. पण, युझवेंद्र चहलने ( HAT-TRICK FOR YUZVENDRA CHAHAL) १९व्या षटकात हॅटट्रिकसह चार विकेट्स घेऊन चेन्नईला दोनशेपार जाण्यापासून रोखले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com