आयपीएल 2025 च्या 8व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु (आरसीबी) यांच्यात चुरशीचा सामना झाला. या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजीला उतरलेल्या आरसीबीने कर्णधार रजत पाटीदारच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 20 षटकांत 7 गडी गमावून 196 धावांचा डोंगर उभारला.