

CSK vs RCB IPL 2025 : महेंद्रसिंग धोनी ४२ वर्षांचा असला तरी यष्टिंमागे त्याच्या चपळतेला अजूनही कुणी आव्हान देणारा उभा राहिलेला नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात MS Dhoni ने पुन्हा एकदा चपळ स्टम्पिंग करून सर्वांना अवाक् केले. धोनीने स्टम्पिंग केल्यावर जेव्हा अम्पायरकडे दाद मागितली, तेव्हा अम्पायरचा फार रस दिसला नाही. पण, धोनी अपील करतोय म्हटल्यावर त्याने तिसऱ्या अम्पायरकडे दाद मागितली अन् आश्चर्यच झाले.