DC vs MI Live: ४,४,६,४,६... टीम इंडियाला नकोसा, आज जसप्रीत बुमराहवर बरसला; Karun Nair सॉलिड खेळला, वेगवान फिफ्टी

IPL 2025 मधील DC vs MI सामन्यात करुण नायरने जबरदस्त पुनरागमन करताना मैदानात धुमाकूळ घातला. जसप्रीत बुमराहसारख्या दर्जेदार गोलंदाजाला ४,४,६,४,६ अशा फटक्यांनी सळो की पळो करून २२ चेंडूत अर्धशतक ठोकलं. टीम इंडियामध्ये फारसा विचार न केला गेलेल्या नायरने आपल्या कौशल्याने पुन्हा एकदा प्रकाशझोतात प्रवेश केला.
KARUN NAIR
KARUN NAIR esakal
Updated on

Delhi Capitals vs Mumbai Indians Marathi News तीन वर्षानंतर इंडियन प्रीमिअर लीगमधून पुनरागमन करणाऱ्या करूण नायरने ( Karun Nair) आज त्याला संधी न देणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार खेळ करूनही टीम इंडियाला नकोसा असलेला करूण आज दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या संधीवर बरसला. त्याने जगातील सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराहला ( Jasprit Bumrah) टार्गेट केले. त्याच्या दोन षटकांत असे काही सुरेख फटके खेचले, की स्टेडियम दणाणून गेले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com