Delhi Capitals vs Mumbai Indians Marathi News: आयपीएल २०२५ मध्ये अपराजित राहिलेला एकमेव संघ, दिल्ली कॅपिटल्स आज घरच्या मैदानावर ५ सामन्यांत ४ पराभव पत्करलेल्या मुंबई इंडियन्सचा सामना करतोय. कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्माचा फॉर्म हा आजही चर्चेचा विषय असेल, यात शंका नाही. दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल न करण्याचा निर्णय घेतला.