Delhi Capitals vs Mumbai Indians Marathi News मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातल्या इंडियन प्रीमिअर लीग २०२५ चा सामना नाट्यमय राहिला. मुंबईच्या २०५ धावांचा पाठलाग करताना करुण नायरने ( Karun Nair) वादळी खेळी केली, परंतु रोहित शर्माने डग आऊट मध्ये बसून सूत्र हलवली. माजी कर्णधार रोहितच्या सल्ल्याने हार्दिक पांड्याने डाव टाकला आणि दिल्लीच्या तोंडचा घास हिरावला जातोय, अशी स्थिती निर्माण झाली.