IPL 2025 Delhi Capitals vs Punjab Kings Marathi News: गुजरात टायटन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांना आपापल्या मागील लढतीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पंजाब किंग्सची क्वालिफायर १ मध्ये पोहोचण्याची संधी वाढली आहे. इंडयन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स असा सामना जयपूर येथे होतोय. DC स्पर्धेतून बाहेर फेकले गेले असले तरी ते विजयाने शेवट गोड करण्याचा प्रयत्न करतील. दिल्लीचा हा या पर्वातील हा शेवटचा साखळी सामना आहे.