
IPL WITNESSIED IT'S FIRST SUPER OVER IN 4 YEARS: ध्रुव जुरेलने १९.५ व्या षटकात शिमरोन हेटमायरला दुसरी धाव घेण्यापासून रोखले नसते, तर कदाचित सुपर ओव्हर पाहायला मिळाली नसती. दिल्ली कॅपिटल्सच्या ५ बाद १८८ धावांच्या प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सला ४ बाद १८८ धावांवर समाधान मानावे लागले. Mitchell Starc ने १८ व्या व २० व्या षटकात टिच्चून मारा करून RR च्या हातची मॅच सुपर ओव्हरमध्ये नेली. त्यातही DC ने स्टार्कवरच super over ची जबाबदारी सोपवली गेली. नो बॉल पडला नसता तर त्याने राजस्थानला रोखले होते. दिल्लीने सुपर ओव्हरमधील १२ धावांचे लक्ष्य सहज पार केले.