
IPL 2025 Mumbai Indians vs Delhi Capitals Marathi Update: दिल्ली कॅपिटल्सच्या फिरकीपटूंनी अक्षर पटेलच्या अनुपस्थितीतही मुंबई इडियन्सविरुद्ध चांगला मारा केला होता. इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मधील आजच्या सामना दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. रोहित शर्माकडून आज मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु तो ५ धावेवर बाद झाला. रायन रिकेल्टन व विल जॅक्स यांनी आक्रमक खेळ केला, परंतु त्यांनाही मोठी खेळी करता आली नाही. सूर्यकुमार यादव व तिलक वर्मा मैदानावर उभे राहिले. मात्र, त्यांना धावांचा वेग वाढवताना संघर्ष करावा लागला.