Why Digvesh Rathi got suspended in IPL 2025 : आयपीएलमध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात लखनौचा गोलंदाज दिग्वेश राठीने हैदराबादचा फलंदाज अभिषेक शर्माबरोबर वाद घातला होता. मात्र, अभिषेक शर्माशी वाद घालणं आता त्याला चांगले भोवलं आहे. बीसीसीआयने दिग्वेश राठी विरुद्ध कारवाई करत त्याला आगामी सामन्यासाठी निलंबित केलं आहे.