
IPL 2025 Mumbai Indians vs Gujarat Titans Marathi Update : गुजरात टायटन्स हा इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मधील सातत्यपूर्ण कामगिरी करणारा संघ आज मुंबई इंडियन्शला टक्कर देणार आहे. मुंबईने पहिल्या सहापैकी पाच सामने गमावले आणि त्यानंतर हार्दिक पांड्याच्या संघाने जबरदस्त पुनरागमन केले. आज मुल्लानपूर येथील लढतीत ते एलिमिनेटरमध्ये GT ला टक्कर देण्यासाठी सज्ज आहेत. पण, रायन रिकेल्टन व विल जॅक्स हे दोन चांगले खेळाडू मायदेशी परतल्याने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल अपेक्षित आहे आणि त्यानुसार मुंबईने तीन बदल केले आहेत.