Kohli’s jersey number 18 and date coincidence : आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएलचा अंतिम सामना रंगणार आहे. दोन्ही संघ आपली पहिली ट्रॉफी जिंकण्यासाठी सज्ज झाले असून आज ट्रॉफी कोण उचलणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. आरसीबीचा संघ यंदा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे आज आरसीबी ट्रॉफी जिंकणार असा दावा अनेकांनी केला आहे. आरसीबीच्या खेळाडूंनीही आपण विराट कोहलीसाठी ट्रॉफी जिंकणार असल्याचं म्हटलं आहे.