Jos Buttler IPL 2025 Gujarat Titans Playoffs Absence : उद्यापासून सुरु होणाऱ्या उर्वरित आयपीएलमध्ये कोण कोण परदेशी खेळाडू खेळणार, हे आता निश्चित होत आहे. गुजरात टायटन्स संघाला प्लेऑफमध्ये हुकमी फलंदाज जॉस बटलरशिवाय खेळावे लागेल. त्याच वेळी कोलकाता संघातील इंग्लंडच्या मोईन अलीने भारतात न परतण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात २९ मेपासून व्हाईट बॉल क्रिकेटची मालिका सुरू होत आहे. बटलर आता कर्णधार नसला तरी तो इंग्लंडचा हुकमी फलंदाज आहे.