When Jasprit Bumrah Return? मुंबई इंडियन्सची इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मधील सुरुवात काही खास झालेली नाही. त्यांना दोन्ही सामन्यांत हार पत्करावी लागली आहे आणि ते गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहेत. प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याची उणीव त्यांना प्रकर्षाने जाणवतेय आणि हिच गोष्ट MI च्या चाहत्यांची चिंता वाढवणारी आहे. अशात जसप्रीत बुमराह केव्हा परतणार आहे, याची सर्वांना उत्सुकता आहे आणि याबाबतचे महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहेत.