IPL 2025 Delhi Capitals vs Gujarat Titans Marathi News : शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी गुजरात टायटन्सच्या विजयाचा पाया घातला. या दोघांनी या पर्वात आतापर्यंत ७७६* धावा एकत्रित जोडल्या आणि एका पर्वातील दोन खेळाडूंमधील या सर्वाधिक धावा ठरल्या. यापूर्वी शिखर धवन व पृथ्वी शॉ यांनी २०२२१ मध्ये ७४४ धावा जोडल्या होत्या. साई व गिल यांची ही आयपीएलमधील सातवी शतकी भागीदारी ठरली आणि त्यांनी विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस ( ६) यांचा विक्रम मोडला. साईने त्याच्या खेळीचे शतका रुपांतर केले.