
IPL 2025 Gujarat Titans vs Lucknow Super Giants : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ चे प्ले ऑफचे चारही संघ निश्चित झाले आहेत आणि आता क्वालिफायर १ मध्ये जागा पक्की करण्याची चढाओढ सुरू झाली आहे. गुणतालिकेत १८ गुणांसह अव्वल स्थानी असलेल्या गुजरात टायटन्सचा आज लखनौ सुपर जायंट्सची सामना होणार आहे. २७ कोटींच्या रिषभ पंतच्या LSG ला यंदाच्या पर्वात पूर्ण अपयश आले आणि परिणामी संघही तालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे उर्वरित सामन्यात विजय मिळवून किमान पुढील पर्वासाठी आत्मविश्वास उंचावण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.