
IPL 2025 Mumbai Indians vs Gujarat Titans Marathi Update : रोहित शर्माला प्ले ऑफ लढतीत फार काही चांगली कामगिरी करता आलेली नाही, हा आयपीएलचा इतिहास सांगतो. आजही तसेच काहीचे चित्र दिसले असते, परंतु गुजरात टायटन्सच्या खेळाडूंनी रोहितला अनुक्रमे ४ व १२ धावांवर जीवदान दिले. रोहितचे सोपे झेल सुटलेले पाहून मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांचा जीव भांड्यात पाडला.