
IPL 2025 Mumbai Indians vs Gujarat Titans Marathi Update : मुंबई इंडियन्सने त्यांना चॅम्पियन संघ का म्हणतात हे पुन्हा एकदा दाखवले. आयपीएल २०२५ मधील पहिल्या सहापैकी पाच सामने गमावूनही मुंबईचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचला. आज त्यांनी गुजरात टायटन्सविरुद्धच्या एलिमिनेटर लढतीत वादळी खेळी केली. जॉनी बेअरस्टोने मुंबईकडून पदार्पण केले आणि त्याला रोहित शर्माच्या आक्रमक खेळीची साथ मिळाली. गुजरातच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा मुंबईला झाला.