IPL 2025 Mumbai Indians vs Gujarat Titans Marathi Update :
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि जॉनी बेअरस्टो व रोहित शर्मा यांनी संघाला पॉवर प्लेमध्ये ७९ धावा कुटून दिल्या. बेअरस्टोने MI कडून पदार्पणाच्या सामन्यात १७ चेंडूंत ४४ धावा चोपल्या. रोहितला ४ व १२ धावांवर जीवदान मिळाले आणि त्यामुळे त्याचा खेळ थोडा संथ झाला. पण, बेअरस्टो आज काही ऐकत नव्हता आणि त्याला अफलातून कॅचने माघारी पाठवण्यात गुजरातला यश मिळाले.