IPL 2025 Delhi Capitals vs Gujarat Titans Marathi News : शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी गुजरात टायटन्सच्या विजयाचा पाया भक्कम केला. दिल्ली कॅपिटल्सने समोर ठेवलेल्या २०० धावांचा पाठलाग करताना GT च्या सलामीवीरांनीच शतकी भागीदारी केली. गुजरातने हा सामना जिंकून १८ गुणांची कमाई करून प्ले ऑफमधील स्थान पक्के केले आहे. DC चे इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मधील आव्हान जवळपास संपल्यात जमा आहे. GT सह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व पंजाब किंग्स यांचेही प्ले ऑफमधील स्थान पक्के झाले आहे.