
IPL 2025 Gujarat Titans vs Lucknow Super Giants : लखनौ सुपर जायंट्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये गुरुवारी गुजरात टायटन्सला पराभूत केले. मिचेल मार्शच्या वादळी शतकाच्या जोरावर LSG ने २३५ धावांचा डोंगर उभा केला. GT च्या सलामीवीरांनी यापूर्वी २००+ हून अधिक धावांचा पाठलाग करून दाखवला होता, परंतु आज ते अपयशी ठरले. गुजरात टायटन्सचा या पराभवामुळे क्वालिफायर १ मधील प्रवेश लांबणीवर पडला आहे. त्यांना शेवटच्या साखळी सामन्यात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ( २५ मे) विजय मिळवावा लागणार आहे. तसे न झाल्यास पंजाब किंग्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांना क्वालिफायर १मधील जागा पक्की करण्याची संधी मिळाली आहे.