Hardik Pandya Fined for Slow Over-Rate in IPL 2025 : आयपीएलमध्ये शनिवारी गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात गुजरातने मुंबईचा ३६ धावांनी पराभव केला. या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना मुंबईसमोर २० षटकांत १९६ धावांचं लक्ष ठेवलं. या लक्षाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला मात्र २० षटकांत केवळ १६० धावांपर्यंत मजल मारता आली.