RCB’s IPL 2025 journey decoded : आयपीएल 2025 चा अंतिम सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार असून या हायव्होल्टेज सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. गेल्या १८ वर्षांपासून दोन पैकी एकाही संघाला आयपीएलचं विजेतेपद जिंकता आलेलं नाही, त्यामुळे आजचा सामना जिंकत आयपीएल ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचा दोन्ही संघांना प्रयत्न असणार आहे.